Thursday, February 13, 2020

बालकवी च्या कविता

                                                             बालकवी च्या कविता 
१ फुलराणी 
हिरवे हिरवेगार गालीचे   
हरित तृनाच्या मखमालीचे 
त्या सुंदर मखमालीवरती 
फुल राणी हि खेळात होती. 

२ दोष असती जगतात 
दोष असता जगतात किती याचे 
नसे मजला सामर्थ्य गणनायचे 
दोष माझ्या परी हाच मला वाटे 
दोष वध्यता सत्प्रेम कसे आहे?
३ आनंदी आनंदी गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे 
४ कोठुनी येति मला कळेना उदासनीता हि हृदयाला 
काय बोचते हे समजेना ह्रदयाच्या अंर्तहृदयाला 
५ फुलपाखरू!
छान किती दिसते!फुलपाखरू 
मी धरू जात ! येई न हाता 
दूरच उडते ते फुलपाखरू 
६ श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे: क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे 
७ एल तटावर पैल तटावर हिरावली घेऊन निळासावला जरा वाहतो बेटा बेटातुन 
झाकुळनी जल गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर 
मराठी कविता व निसरग कविता असा विषय निघाला म्हणजे ओठावर पहिले नाव ओठावर येते ते बालकवींचे नाव मराठी कवितेतले एक महत्वाचे प्रतिभा वंत कवी त्यांचा जन्म १८९० जळगाव जिल्ह्यातील धरन गावचा वयाच्या १६ व्य वर्षी वनवासी साधु महाराजा सोबत निघून गेले पुन्हा खान्देशात परतले वयाच्या १३ व्या वर्षी विवाह झाला वयाच्या १७ व्या वर्षी पहिली कविता आणि वयाच्या २७ व्या वर्षी जळगाव नजीकच्या भादली रेल्वे स्टेशन च्या रुळावर अपघातात वारले. त्यांचे लेखन अवघ्या १० वर्षच्या एवढ्या कमी आयुष्यात पावणे दोनशे कविता लिहल्या त्यातील बऱ्याच अपूर्ण आहे मनाची अस्थिरता कौटुंबिक लहरीपणा व आर्थिक ताणतणाव यात जगणं उदासीन व शेवटी काळोखी होत गेले असा महान कवी महाराष्ट्रला लाभला याचेच भाग्य 


1 comment: